PostImage

सुपर फास्ट बातमी

Aug. 23, 2024   

PostImage

वीज पडून युवकाचा जागीच मृत्यू


हर्ष साखरे मुख्य संपादक सुपर फास्ट बातमी 

 

राजुरा तालुक्यातील नलफडी शिवारातील घटना

 

राजुरा : राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन परिसरातील नलफडी गावातील २५ वर्षीय युवक शेतातून काम करून घरी परतत असताना दि. २२ ऑगस्टला दुपारी अंगावर वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आकाश कालिदास पाकुलवार असे मृतकाचे नाव आहे.

 

मागील एक महिन्यापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. मात्र मागील आठवड्या पासून पावसाने दडी मारली आहे. दरम्यान दुपारच्या सुमारास नलफळी शिवारात निलगिरी शेतात आकाश पाकुलवार सह आणखी चार शेतमजूर काम करीत होते. काम करीत असताना अचानक आभाळ दाटून आले व विजाचा कडकडाट सुरू झाला. त्यामुळे पाचही मजूर घराकडे निघाले. चार शेतमजूर समोर काही अंतरावर होते व मागे आकाश होता. त्याचवेळी वाटेतच आकाशच्या अंगावर वीज पडली व त्याचा जागीच मृत्यू झाला. 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Aug. 15, 2024   

PostImage

गोसीखुर्दच्या नहरात एक तरुण बुडाला


सावली तालुक्यातील आसोला मेंढा तलाव मध्ये आज हजारो पर्यटक हे फाल पाहण्यासाठी गेले होते त्यातच गडचिरोली जिल्ह्यातील 4 मित्र ही आज आलेले होते. मात्र परत येत असतांना एक मित्र पायाला माती लागली म्हणून पाय धुण्यासाठी नहरात गेला असता पाय घसरला आणि त्यात बुडाला अशी माहिती मिळते आहे.

 

 

त्यातच त्याचे इतर तीन मित्र हे वाचविण्यासाठी आरडा ओरड केले मात्र तो वाहत गेला. या घटनेची माहिती पाथरी पोलिसांना माहिती देण्यात आली. लागलीच पोलीस तत्परतेने घटनास्थळी आले. तसेच बचाव साठी कार्य सुरु झाल्याची माहीती पुढे येत आहे. वाहून गेलेल्या युवक हा गडचिरोली जिल्ह्यातील नवेगाव येथील पवन सेडमाके असल्याचे कळते आहे. व त्याच्या सोबतइतर 3 जण होते अशी माहिती मिळते आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 16, 2024   

PostImage

पत्नीच्या विरहात पोलिस शिपायाने घेतला गळफास


 

बल्लारपूर : येथील ठाण्यात कार्यरत पोलिस शिपायाने वसाहतीमधील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना सोमवारी (दि. १५) सकाळी उघडकीस आली. अजय पांडुरंग मोहुर्ले (४०) असे मृत पोलिस शिपायाचे नाव आहे. पत्नी विरहात आत्महत्या केल्याची चर्चा आहे. पोलिस शिपाई अजय मोहुर्ले हे वस्ती विभागातील पोलिस वसाहतीत राहत होते.

 

चंद्रपुरातील त्यांचे मामा हरिचंद्र निकुरे हे सोमवारी त्यांना भेटण्यासाठी पोलिस वसाहतीत आले. पण आतून दरवाजा बंद दिसला आणि दुर्गंधी येत होती. त्यांनी लगेच शेजारचे कर्मचारी व पोलिसांना माहिती दिली. दरवाजा उघडून बघितले असता अजय मोहुर्ले यांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले.

 

मृतदेहाची अवस्था बघून दिवसांपूर्वी दोन आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला. पंचनामा करून पोलिसांनी शवविच्छेदनासाठी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालय येथे पाठविले. अजयला दारूचे व्यसन असल्याने पत्नी सोबत वाद होत असे. त्यामुळे ती सहा दिवसांपूर्वी सात वर्षांच्या मुलाला घेऊन नातेवाइकांकडे गेली. त्यामुळे पत्नी विरहात आत्महत्या केली असावी, अशी चर्चा आहे. या घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक साखरे, पोलिस निरीक्षक आसिफ राजा बी. शेख यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष येनगंधेवार, खंडेराव माने करीत आहेत.

 

 


PostImage

News mh33 live

June 25, 2024   

PostImage

पत्रकार संजय पडोळे यांना जीवे मारण्याची धमकी सावली तालुक्यातील पत्रकार …


पत्रकार संजय पडोळे यांना जीवे मारण्याची धमकी

 

सावली तालुक्यातील पत्रकार संघातर्फे निषेध

 

‘त्या‘कॉंग्रेस नेत्याविरूदध कारवाई करा - मागणीचे निवेदन प्रशासनाला सादर

 

 

मूल येथील तालुका पत्रकार संघाचे जेष्ठ सदस्य आणि दै.पुण्यनगरीचे प्रतिनिधी,व्हॉईस ऑफ मिडियाचे जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांना कॉंग्रेसच्या एका नेत्याने जीवे मारण्याची आणि परिवाराला संपविण्याची धमकी देण्यात आली.त्या घटनेचा सावली तालुक्यातील सर्व पत्रकार संघातर्फे निषेध करण्यात आला. याबाबत तीनही पत्रकार संघाची तातडीची सभा घेण्यात आली.त्यात निषेधाचा ठराव घेण्यात आला. आणि धमकी देणारे कॉंग्रेसचे नेते प्रकाश मारकवार यांच्या विरूदध कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली. या मागणीचे निवेदन सावली येथील तहसिलदार आणि पोलिस निरिक्षक यांना देण्यात आले. पुण्यनगरी मध्ये प्रसिदध झालेल्या एका बातमीच्या संदर्भात कॉंग्रेसचे नेते प्रकाश मारकवार यांनी संजय पडोळे हे आपल्या कर्तव्यावर असताना भ्रमणध्वनी वरून जीवे मारण्याची धमकी आणि परिवाराला संपविण्याची भाषा वापरली. एखादया बातमीच्या संदर्भात वृत्तपत्राच्या बातमीदाराला धमकी देणे म्हणजे वृत्तपत्राच्या स्वातंत्र्यांची पायमल्ली करण्यासारखे आहे. प्रत्येक बातमीदाराला आपआपल्या प्रकारे लिखाणाचे स्वातंत्र्य आहे.हे स्वातंत्र्य कोणी हिरावून घेत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही.हे अशोभनीय कृत्य आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वृत्तपत्राच्या प्रतिनिधींना संरक्षण मिळालेच पाहिजे,अशा आशयाचा ठराव तीनही पत्रकार संघातर्फे घेण्यात आला.व्यक्ती कोणीही आणि कोणत्याही पक्षाचा का असेना त्याचा निषेध झालाच पाहिजे असे मत उपस्थित पदाधिका-यांनी आणि सदस्यांनी व्यक्त केले. या घटनेचा निषेध करून प्रकाश मारकवार यांच्या विरूदध प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.मागणीचे एक निवेदन सावलीचे तहसिलदार प्रांजली चीरडे आणि पोलिस निरिक्षक जीवन राजगुरू यांना देण्यात आले. निवेदन देताना मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सूरज बोम्मावार , व्हॉईस ऑफ मीडियाचे अध्यक्ष प्रवीण झोडे,ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल गुरनुले,प्रा.शेखर प्यारमवार,प्रा.विजय गायकवाड,चंद्रकांत गेडाम, डॉ.कवठे,गोपाल रायपुरे,विजय कोरेवार,नासीर अन्सारी, गिरीश चीमुरकर,सुजित भसारकर,सौरव गोहने,प्रवीण गेडाम इत्यादी सदस्यगण उपस्थित होते.

 

बॉक्स

 

पत्रकार संजय पडोळे यांनी सावली पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली.याबाबत चौकशी सुरू झालेली असून या बाबत दोन्ही पक्षा कडून त्यांचे बयान नोंदविलेले असून याबाबत कारवाई करणार असल्याची माहिती ठाणेदार राजगुरू यांनी शिष्टमंडळाला दिली


PostImage

News mh33 live

June 22, 2024   

PostImage

फुस लाऊन केले अल्पवयीन मुलीचे अपहरण ,आरपीएफ व जीआरपी पोलिसांनी …


फुस लाऊन केले अल्पवयीन मुलीचे अपहरण ,आरपीएफ व जीआरपी पोलिसांनी युवकाला केली अटक

 

 

 

बल्लारपूर : एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून केरला एक्स्प्रेसमधून बिहारकडे नेत असताना आरपीएफ व जीआरपी पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी बल्लारशाह रेल्वेस्थानकावर युवकाला अटक केली. मोहम्मद मिया सलीम (३८) रा. बेलवा बिहार असे आरोपीचे नाव आहे.

२१ जुन ला नियंत्रण कक्ष, लोहमार्ग नागपूर येथुन फोनव्दारे जीआरपी पोलीस तसेच आरपीएफ माहिती मिळाली की केरला एक्स्प्रेस ने नाबलिक बालिकेला अपहरण करून बिहार ला घेऊन जात आहे. आरपीएफ निरीक्षक सुनील पाठक यांनी दोन पथक तयार केले. त्यामध्ये शासकीय रेल्वे पोलीस, रेल्वे चाइल्ड लाईनचे क्षेत्रीय कार्यकर्ते व रेल्वे सुरक्षा बल यांच्या संयुक्त कार्यवाहीने, ट्रेन नं १२६२५ केरला एक्सप्रेसने अज्ञात व्यक्तीच्या ताब्यात असलेली बालिका फरांना (नाव बदलेले ) (१२) रा.दुबीलीया, कुरवा माथीया जि. पश्चिम चंपारण (बिहार) हिला एक इसम अपहरण करून नेत असल्याची माहिती मिळाली. 

नमुद ट्रेन मपोशि किर्ती मिश्रा, पोशि निलेश निकोडे, भास्कर ठाकूर, बबिता लोहकरे, चाईल्ड लाईन टीम, आरपीएफ निरीक्षक सुनील पाठक व त्यांचे सहकारी तपास सुरू केला असता रेल्वे स्टेशन येथील फलाट क्र. ३ वर ट्रेन आल्याने पुढील जनरल कोच मध्ये सदर बालिका मिळून आल्याने बालिकेस रे.पो. चौकी बल्हारशाह येथे आणुन हजर केले. विचारपूस केली असता बालिकेसंदर्भात पो स्टे. अंबलापुझा केरला येथे तक्रार दाखल असुन सदरचे पो.स्टे चा पोलीस स्टॉफ त्या मुलीला ताब्यात घेण्याकरीता येत आहे. 

बाल कल्याण समिती, चंद्रपूर येथे दाखल करणे असल्याने नमुद बालिकेची वैद्यकिय तपासणी करून सदर बालिके विषयी माहिती तात्काळ अजय साखरकर, बाल संरक्षण अधिकारी आणि बाल कल्याण समिती, अध्यक्षा ऍड. क्षमा बासरकार यांना दिली व त्यांच्या मौखिक आदेशाने बालिकेला तात्पुता निवारा करिता सखी वन स्टॉप सेंटर, चंद्रपूर येथे ठेवण्यात आले असून आरोपीविरुद्ध पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.


PostImage

News mh33 live

June 21, 2024   

PostImage

जादुटोणाच्या संशयावरून एका वृद्धाची हत्या


जादुटोणाच्या संशयावरून एका वृद्धाची हत्या

 

चंद्रपूर Chandrapur जिल्ह्यातील नागभीड Naghbhid तालुक्यातील मौशी गावात जादुटोणाच्या संशयावरून एका वृद्धाची हत्या झाल्याचा प्रकार समोल आला आहे. आसाराम दोनाडकर (वय 67) असं मृत वृद्धाचे नाव आहे. 

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार गुरुवारी रात्री आठच्या सुमारास आसाराम दोनाडकर यांच्या घरावर काही लोकांचा जमाव चाल करून गेला. जादूटोणा करतो म्हणून त्यांच्याशी जमावाने वाद घातला. दोनाडकर यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण देखील झाली.

 

ही मारहाण ते बेशुद्ध होईपर्यंत झाली. काहींनी त्यांना उपचारासाठी Hospital रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिका-यांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळी नागभीड Police officer पोलिस ठाण्याचे ठाणेदार विजय राठोड यांनी भेट दिली. या प्रकरणी पोलिसांनी संतोष जयघोष मैंद (वय 26), श्रीकांत जयघोष मैंद (वय 24), रुपेश देशमुख (वय 32) या संशियतांना Arrest अटक केली.


PostImage

News mh33 live

June 12, 2024   

PostImage

पोलिसांनी २४ तासाचा आत दुचाकी चोरी आणि घरफोडी आरोपीच्या मुसक्या …


 पोलिसांनी २४ तासाचा आत दुचाकी चोरी आणि घरफोडी आरोपीच्या मुसक्या आवळल्या

 

बल्लारपूर : बल्लारपूर पोलीसांनी २४ तासाचा आत दुचाकी चोरी आणि घरफोडीचे आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून तीन आरोपींना अटक केले आहे.
८ जुन रोजी येथील नवीन बस स्टँड वरून रविंद्र कवडू शिडाम यांची दुचाकी क्र. MH ३४ BW ८७९३ चोरी गेली होती. त्यांनी १० जुन रोजी बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती. 
याची दखल घेत पोलीसांनी पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या नेतृत्वात चक्र फिरवून आरोपी किशोर श्यामराव त्रिसुलवार (२८) रा. राजेंद्र प्रसाद वार्ड बल्लारपूर याच्या मुसक्या आवळल्या. तसेच विद्या नगर येथील राजू महादेव पिंपळकर आपल्या परिवार सोबत बाहेर गावी गेले असता त्यांचा घरी अज्ञात चोराने घरच्या दरवाजाची कुंराजु पिंपळकर यांनी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. त्या वरून पोलीसांनी गुन्हा नोंद केले.
पोलीसांनी तक्रार ची नोंद घेत आरोपी तिरूपती उर्फ लड्या अशोक दासरवार (२७) रा. गौरक्षन वार्ड व ऋतिक विठ्ठल उपरे याला अटक करून मुद्देमाल जप्त केले.
     सदर कारवाई कारवाई पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, दिपक साखरे उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे मार्गदर्शनात पो.नि. आसिफराजा बी. शेख, सफौ गजानन डोईफोडे, पोहया. सुनिल कामटकर, पोहवा, संतोष दंडेवार, पोहवा, रणविजय ठाकूर, पुरुषोत्तम चिकाटे, सत्यवान कोटनाके, वशिष्ट रंगारी, सरदचंद्र कारुष, मिलींद आत्राम, शेखर माथनकर, श्रिनिवास वाभिटकर यांनी केली आहे. कुंडी तोडून एक ग्राम सोन्याची नथ, ३ चांदीचे शिक्के, १० ग्राम चांदीचे कुयरी व ६ हजार रुपये नगदी चोरी केले होते.


PostImage

News mh33 live

April 1, 2024   

PostImage

दुचाकी चोरणाऱ्या तीन युवकांना अटक


दुचाकी चोरणाऱ्या तीन युवकांना अटक

 

बल्लारपूर : येथील गांधी कॉम्प्लेक्स येथून मोपेड दुचाकी चोरणाऱ्या तीन युवकांना बल्लारपूर पोलीस स्टेशन गुन्हे शाखेने अटक केले.

येथील जूना बस स्टँड गांधी कॉम्प्लेक्स येथे २७ मार्च रोजी विशाल दिलीप पिसुडे रा. शिवाजी वार्ड बल्लारपूर यांनी आपली मोपेड वाहन क्र. एमएच ३४ एयु ७९४४ ठेवून कॉम्प्लेक्स मध्ये गेले होते. काही वेळा नंतर ते येऊन बघितल्यास त्यांना आपले गाडी दिसले नाही. त्यांनी शोधाशोध केले. पण त्यांना गाडी मिळाली नाही. त्यांनी दुसऱ्या दिवसी बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिले. त्यावरून डी. बी. चे पोहवा सत्यवान कोटनाके, पोहवा रणविजय ठाकूर, पोशि श्रीनिवास वाभीटकर यांना माहिती मिळाली की तीन युवक कारवा रोड कडे मोपेड गाडी घेऊन फिरत आहे.

त्यावरून त्यांना विचारपूस केले असता ती चोरीची वाहन होते. गुलशन मनमित सिंग दलवेद (१९) शिव नगर बल्लारपूर, प्रेम राजेंद्र ढवस (१९) दादाभाई नौरोजी वार्ड बल्लारपूर, आतिफ मुमताज अली (१९) दादाभाई नौरोजी वार्ड बल्लारपूर यांना अटक केले. सदर आरोपी वर रामनगर चंद्रपूर तसेच सिटी पोलीस स्टेशन चंद्रपूर येथे वाहन चोरीचे गुन्हे दाखल होते. ते नुकतेच २० मार्च रोजी सुटून आले होते. 

पुढील तपास पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा सत्यवान कोटनाके करीत आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 28, 2024   

PostImage

अल्पवयीन मुलीचा पाठलाग आरोपीची कारागृहात केली रवानगी


 

 चंद्रपूर, ब्युरो. अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून त्रास देणाऱ्या आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडीची मागणी केली. परंतु न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली. ही सुनावणी बुधवारी (दि.27) करण्यात आली. आरोपी आदित्य बिगनशहा सोनी राहणार गुरुदेव चौक याला सिंदेवाही पोलिस ठाण्याचे पोलिसांनी न्यायालयात हजर केले. यावेळी जिल्हा विधी सेवा

 

प्राधिकरणाच्या अंतर्गत असलेल्या लोक अभिरक्षक कार्यालयाचे वतीने आरोपीला मोफत विधी सेवा व सहाय्य पुरविण्यात आले. लोक अभिरक्षक कार्यालयाचे मुख्य लोक अभिरक्षक अॅड. विनोद बोरसे यांनी आरोपीच्या वतीने न्यायालयात वकीलपत्र दाखल केले. त्याप्रमाणे आरोपीची न्यायालयीन कोठडीची मागणी मंजूर करण्यात येऊन आरोपीची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.


PostImage

News mh33 live

March 25, 2024   

PostImage

दोन दुचाकी वाहनांची एकमेंकांना समोरासमोर धडक! संपूर्ण जखमी


दोन दुचाकी वाहनांची एकमेंकांना समोरासमोर धडक! संपूर्ण जखमी 

 

सिंदेवाही : एकीकडे संपूर्ण तालुक्यात धुलिनंदन साजरा होत असतांना सायंकाळ च्या सुमारास मौजा मेंढा (माल ) च्या समोर दोन दुचाकी एकमेकांना आदलळ्या त्या त्यामध्ये दोन्ही दुचाकी वरील सहा जण जखमी झाले, जखमी मध्ये ३ वर्षाच्या मुलीचा समावेश आहे,मिळालेल्या माहिती नुसार मौजा कोळसा (पांगडी) येथील रहिवासी सचिन शेडमाके वय वर्ष अंदाजे ३५ वर्ष हा आपल्या पत्नी व ३ वर्षाच्या मुलीला घेऊन नागभीड इथे आपल्या दुचाकी वाहन क्रं MH 34 CC 2011याने जात होता, तर विरुद्ध दिशेने मौजा पळसगाव (जाट ) कडून आपल्या स्कुटी या क्रं MH 34 CC 9623

या वाहनाने ट्रिप्पल सीट वैष्णवी अशोक सावसाकडे वय वर्ष २२ हेटी वॉर्ड सिंदेवाही,डिम्पल गुरनुले २० वर्ष सिंदेवाही ख़ुशी कृपा उंदीरवाडे वय १९ ह्या तीन मुली येत होत्या मौजा मेंढा(माल) च्या समोर गाडीवरून नियंत्रण सुटल्याने एकमेंकांना जाऊन धडकल्या,त्या मध्ये ३ वर्ष्याच्या मुलींसह सर्व च जखमी झाले आहेत वृत्त लिहत पर्यंत गंभीर जखमी असल्याने सर्वाना चंद्रपूर ला रेफर केले होते,

*सिंदेवाही पोलीस विभागाची कर्तव्यदक्षता*

या अपघाताची माहिती मिळताची पी एस आय सागर महल्ले,सहकारी 

 रणधीर मंदारे, विनोद बावणे व इतर कर्मचारी घटना स्थळी दाखल होऊन जखमी ना रुग्णवाहिकेची वाट न बघता आपल्या गाडीत आणून ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही मध्ये भरती केले, पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शन मध्ये सतत तालुक्यात पेट्रोलिंग करून कुठेही अनुचित प्रकार घडू नये या साठी सकाळ पासून दुचाकी वर ट्रिप्पल सीट जाणाऱ्या च्या दुचाकी पोलीस स्टेशन ला जमा करीत होते तरी पण पोलीस प्रशासन न व कायाद्याला न जुमानता भरधाव वेगाने गाडी चालवून अपघात ला आमंत्रण दिले.


PostImage

News mh33 live

March 24, 2024   

PostImage

ऑटो ला ट्रक ची धडक ; ऑटो चकनाचूर


ऑटो ला ट्रक ची धडक ; ऑटो चकनाचूर

 

 

 

बल्लारपूर : येथील किल्ला वार्ड मध्ये एका ट्रक ने उभ्या असलेल्या ऑटो ला मागून धडक दिल्याने ऑटो चकनाचुर झाला आहे.

२१ मार्च रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास ऑटो ला ट्रक ने मागून धडक दिले. ऑटो चालक मालक उमेश दूपारे हा ऑटो क्र एमएच ३४ डी ६२५६ चा धंदा करून रात्री आपल्या घरा समोर ऑटो ठेवले. रात्री ११ वाजताच्या सुमारास ट्रक क्र. एमएच ४० सीएम ५६२७ ने मागून धडक दिली. ट्रक मध्ये सामान भरून आहे. ते ट्रक बंगलोर ला जाणार होता अशी माहिती मिळाली. जेव्हा तो ट्रक बंगलोर ला जाणार होता, तर त्या १५ फूट चा गल्ली मध्ये कसा गेला. तेथील नागरिकांनी सांगितले की ट्रक चालक हा दारू पिऊन होता तसेच तो विसापुर मार्गाने आला. ऑटो चे एक ते दीड लाखाचे नुकसान झाले आहे.


PostImage

News mh33 live

March 9, 2024   

PostImage

विसापूर फाट्यावर अवैधरित्या वाहतूक करीत असलेली नगदी २४,७५०००/- रोकड जप्त


विसापूर फाट्यावर अवैधरित्या वाहतूक करीत असलेली नगदी २४,७५०००/- रोकड जप्त

 

बल्लारपूर /- दि. 07/03/2024 रोजी गोपनिय माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळाली की, बल्लारशाह कडून चंद्रपूरकडे एक इसम दुचाकीवर काळया बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात नगदी रोकड घेवून येणार आहे. अशा खात्रीशीर खबरे वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. महेश कोडावार यांनी स.पो.नि. हर्षल एकरे, पो.उपनि विनोद भुरले, पो.हवा. संजय आतकुलवार, ना.पो. कॉ. संतोष यलपुलवार, पो.कॉ. गोपाल आतकुलवार, नितीन रायपूरे याचे पथक कारवाई करीता नेमून आदेशीत केले.

       सदर पथक मिळालेल्या खबरे प्रमाणे बल्लारशाह रोडवरील विसापूर टोलनाक्या समोरील वळणार सापळा रचला असता खबरे प्रमाणे दुचाकीवर एक इसम पाठीवर बैंग लटकवून दुचाकीवर येताना दिसता त्यास थांबवून त्याचे नाव गाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव ज्ञानेश्वर रमेश चंनदबटवे यय 34 वर्षे व्यवसाय आयुर्वेदीक शॉप रा.112 ईडब्युएस नंदनवन सदभावना नगर प्लॉट नं.112 नागपूर असे सांगीतले. त्यास थांबविण्याचे कारण सांगून आमची पोलीस असल्याची ओळख करून देवून त्यास आमचे ओळखपत्र दाखवून त्याचे जवळील काळया रंगाचे कॉलेज बॅगची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे बॅगमध्ये नोटाचे बंडल दिसून आले. ते पंचासमक्ष बॅगमधुन काढून पाहणी केली असता 22.26,000/-रु. ज्यात 500/-रु.च्या 4652 नोटा, 1,49,000/-रु. ज्यात 200/-रु.च्या 745 नोटा असा एकूण 24,75,000/-रू नगदी रक्कम मिळून आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात नगदी रोकड मिळून आली सदर रोकड त्याने चोरी किंवा अवैध्य मार्गाने प्राप्त केली असा संशय आल्याने कलम 41 (1) (ड) दं.प्र.सं. अन्वये सदर रोकड ताब्यात घेण्यात आली.

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स.पो.नि.हर्षल एकरे, पो.उपनि.विनोद मुरले, पो.हवा. संजय आतकुलवार, ना.पो.कॉ. संतोष यलपुलवार, पो.कॉ. गोपाल आतकुलवार, नितीन रायपूरे यांचे मदतीने केली असुन सदर रोकड बाबतचा तपास पोउपनि विनोद भूरले, स्था.गु.शा. चंद्रपूर हे करीत आहे.


PostImage

News mh33 live

Feb. 13, 2024   

PostImage

सकाळी जेव्हा जॉकीस ने आई ला हाक मारली असता ती …


सकाळी जेव्हा जॉकीस ने आई ला हाक मारली असता ती उठली नाही, आई च्या जवळ गेला असता ती मृत अवस्थेत होती

 

 

ब्रह्मपुरीं पोलिसांनी केली आरोपी पतीला अटक

 

 

 

ब्रम्हपुरी:- तालुक्यातील पाच किमी अंतरावर असलेल्या मालडोंगरी येथे 12 फेब्रुवारीला सकाळी हत्येची धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले. 

 

मालडोंगरी येथे राहणारे जयदेव पिल्लेवान व त्याची पत्नी हिरकण्या यांच्यामध्ये मागील 3 दिवसापासून भांडण होत होते, 11 फेब्रुवारीला रात्री 11 वाजताच्या सुमारास पती-पत्नी मध्ये पुन्हा वाद झाला. त्यावेळी मुलगा जॉकीस हा उपस्थित होता, मात्र नेहमीच होत असलेला हा प्रकार बघून त्याने लक्ष दिले नाही. 

 

सकाळी जेव्हा जॉकीस ने आई ला हाक मारली असता ती उठली नाही, आई च्या जवळ गेला असता ती मृत अवस्थेत होती, मृतक हिरकण्या यांच्या चेहऱ्यावर मारल्याच्या खुणा होत्या.

 

मृतक हिरकण्या यांनी पती जयदेव ला शिवीगाळ केल्याने त्यांनी हिरकण्या ला हाथ-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली, त्या मारहाणीत हिरकण्या यांच्या चेहऱ्यावर व डोक्यावर मार लागला त्या मारहाणीत हिरकण्या यांचा मृत्यू झाला होता.

 

मुलगा जॉकीस याने याबाबत ब्रह्मपुरीं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असता पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, घटनेचा पंचनामा करीत आरोपी जयदेव ला अटक केली. पुढील तपास ब्रह्मपुरीं पोलीस करीत आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 12, 2024   

PostImage

टीचर ने छात्र को 6 तोले सोने की अंगूठी दी …


गोंडपिपरी पुलिस की कार्रवाई

 

 चंद्रपुर, ब्यूरो। शनिवार को, गोंडपिपरी शहर में एक संगीत शिक्षक ने उसी स्कूल के 10 वीं कक्षा के एक छात्र से छह तोला सोना चुरा लिया, यह दावा करते हुए कि उसकी चाची ठीक नहीं थी और उसके इलाज के लिए पैसे की जरूरत थी। गोंडपिपरी पुलिस ने आरोपी को चंद्रपुर से गिरफ्तार कर लिया है. अखिल रोहनकर  आरोपी का नाम गोंडपिपरी है.

 

गोंडपिपरी में एक सीबीएसई स्कूल है। इस स्कूल में अधिकारियों, कर्मचारियों और पेशेवरों के बच्चे पढ़ते हैं। अखिल रोहनकर को संगीत शिक्षक के रूप में नियुक्त किया गया था। कुछ ही समय में उन्होंने छात्रों का दिल जीत लिया। 

 

माता - पिता के साथ अच्छा परिचय दिया. इसका फायदा उठाते हुए रोहनकर ने 10वीं कक्षा की छात्रा से पैसे की मांग की, जिसने कहा कि उसे अपनी चाची के स्वास्थ्य के लिए पैसे की सख्त जरूरत है। छात्रा ने अपने परिवार को बताए बिना आरोपी को छह तोला सोना दे दिया। कुछ दिन बाद जब सोना वापस मांगा गया तो वह टालमटोल करने लगा। आखिरकार अपने माता-पिता को यह बताने के बाद कि उसके साथ धोखा हुआ है, उसने गुरुवार को शिकायत दर्ज कराई। पुलिस ने अखिल रोहनकर को चंद्रपुर से गिरफ्तार किया है. बताया जाता है कि आरोपी शिक्षक ने कई अभिभावकों के घर जाकर अलग-अलग बहाने से हजारों रुपये वसूले.


PostImage

News mh33 live

Feb. 10, 2024   

PostImage

फसवणूक व विश्वासघात प्रकरणी संजो कॉन्व्हेंटच्या शिक्षकास अटक,विद्यार्थ्यांसह पालकांची लाखो …


फसवणूक व विश्वासघात प्रकरणी संजो कॉन्व्हेंटच्या शिक्षकास अटक,विद्यार्थ्यांसह पालकांची लाखो रुपयांने केली फसवणूक

 

गोंडपीपरी: शहरातील संजो कॉन्व्हेंट मध्ये कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने मावशीची तब्येत बरी नसल्याने उपचारासाठी पैशाची नितातं गरज असल्याचे सांगून त्याच शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासह पालकांकडून पैसे मागितले. एका विद्यार्थीनीने तब्बल सहा तोळे सोने शिक्षकाला दिले.

 काही दिवसांनी दिलेले सोने परत मागितले असता शिक्षकाने सोने देण्यास टाळाटाळ केल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्ष्यात येताच विद्यार्थींनीने पालकाच्या सोबतीने गोंडपीपरी पोलीस स्टेशन गाठून फसवणूक व विश्वासघात केल्या प्रकरणी तक्रार दाखल केली.तक्रार नोंदवताच पोलिसांनी आरोपीस अटक केली. आरोपीचे नाव अखिल रोहणकर रा.वडसा असे आहे.

 

 

गोंडपीपरी येथील संजो कॉन्व्हेंट ही सिबीएससी पॅटर्न ची शाळा आहे. उत्तम व दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने मुलांच्या उज्जल भविष्यासाठी शहरातील मोठे अधिकारी , विविध विभागातील कर्मचारी , लहान-मोठे व्यावसायिक यासह सधन शेतकऱ्यांची मुले या कॉन्व्हेट मधून शिक्षण घेत आहेत . वडसा येथील अखिल रोहणकर यांची संगीत शिक्षक म्हणून संजो कॉन्व्हेंट मध्ये नियुक्ती करण्यात आली. अल्पावधीतच सदर शिक्षकाने विद्यार्थ्यांची मने जिंकली. संगीत शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांसह पालकात सुद्धा चांगली ओळख झाली. नामांकित शाळेत शिक्षक असल्याचा फायदा घेत रोहनकर यांनी मावशीची तब्येत बिघडल्याने उपचारासाठी मोठा खर्च येणार असल्याने पैशाची नितांत गरज असल्याचे एका विद्यार्थीनिला सांगीतले . घरच्यांना काहीही न सांगता तब्बल सहा तोटे सोने विद्यार्थीनीने शिक्षकाकडे आणून दिले. दरम्यान लवकरच सोने परत करणार असल्याचा विश्वास शिक्षकाने दाखविला. काही दिवसांनी विद्यार्थीनीने शिक्षकाला दिलेले सोने परत मागितले असता सोने देण्यास शिक्षकाने टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे समजून येताच विद्यार्थिनीने सदर बाब आई वडिलांना सांगितली. लागलीच गोंडपीपरी पोलीस स्टेशन गाठून शिक्षका विरोधात फसवणूक व विश्वासघात केल्या प्रकरणी तक्रार दाखल केली. तात्काळ गोंडपीपरी पोलिसांनी आरोपीस अटक केली. सदर बाब गोंडपीपरी शहरात पसरताच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण काही दिवसापूर्वी असेच कारण पुढे करीत सदर शिक्षकाने अनेक पालकांच्या घरी जाऊन पैसे मागितले.

 अडचणीत एकमेकांना मदत केली पाहिजे असे म्हणत अनेक पालकांनी आपल्या क्षमतेनुसार पाच हजार, दहा हजार, विस हजार तर काहींनी ५० हजार पर्यंतची रक्कम त्या शिक्षकाला दिल्याचे चर्चतून समोर आले आहे. फसवणूक व विश्वासघात केल्या प्रकरणी

गोंडपीपरी पोलिसांनी त्या शिक्षकाला अटक केली. न्यायालयात आरोपीला हजर करण्यात आले. सदर प्रकरणी पोलिसांकडून ओरोपीची कसून चौकशी व्हावी करीता न्यायालयाने एक दिवसासाठी पीसीआर (पोलीस कस्टडी रिमांड) दिला आहे. 

पुढील तपास गोंडपीपरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोगरे करीत आहे.


PostImage

News mh33 live

Feb. 9, 2024   

PostImage

वाहन पलटून झालेल्या अपघातात तीन महिलांचा घटस्थळीच मृत्यू तर एक …


वाहन पलटून झालेल्या अपघातात तीन महिलांचा घटस्थळीच मृत्यू  तर एक नागपूर येथे नेत असताना वाटेत मरन पावली 

 

ब्रम्हपुरी :- शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील मौजा माहेर येथून वर्धा जिल्ह्यात चना कापायला गेलेल्या 17 महिला काम आटोपून सुमो या वाहनाने परत येत असताना आज दिनाक 8 ला सायंकाळी 7.30 दरम्यान उमरेड तालुक्यातील सिर्सी जवळ वाहन पलटून झालेल्या अपघातात तीन महीलांचा घटना स्थळीच मृत्यू झाला तर एक नागपूर येथे नेत असताना वाटेत मारन पावली वाहनाच्या चालकासह 13 महिला गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

 

ब्रम्हपुरी शहराजवळील माहेर येथील 17 महिला या मागील काही दिवसांपासून वर्धा जिल्ह्यात चना कापणीच्या कामाला जात होत्या. एक सुमो रोज त्यांना चना कापणी करता घेऊन जात असे व सायंकाळी परत वापस माहेर येथे आणून देत असे रात्रौ चालक वाहनं सोबत माहेर येथे मुक्कामी राहत होता.

 

मागील काही दिवसा प्रमाणे माहेर येथील 17 महिला आज दिनाक 8 ला पहाटे सुमो या वाहनात बसून पिंपरी या गावी चना कापणीला गेल्या होत्या. सायंकाळी 7.30 वाजता परत येत असताना उमरेड तालुक्यातील सिर्शी जवळ त्यांच्या वाहनं पलटून गंभीर अपघात झाला. वृत्त लिहे पर्यंत प्राप्त माहिती नुसार अपघातामध्ये रत्नमाला मेश्राम, इंदिरा महाजन, रसिका बागडे या महिलांचा जागीच मृत्यू झाला तर सोनाबाई सिद्दुके ही नागपूर येथे नेत असताना वाटेत मरन पावली जखमी तनवी विनोद मेश्राम, दुर्गा विजय आडकिने,संगीता देविदास आडकिने, विना विक्रांत अडकिने, संध्या संतोष बागडे, सरिता विजय नागापुरे

मनोरथा शांताराम मेश्राम, राजश्री राजेश्वर मेश्राम, बेबी ईश्वर मेश्राम, जनाबाई अर्जुन बावणे, अश्विनी अरविंद बागडे या महिला सह सुमोचा वाहन चालक शंकर प्रभाकर मसराम वय 30 राहणार जांभुळघाट हा गंभीर जखमी झाल्या असल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश वारजुरकर यांना होताच यांनी घटनास्थळ गाठून मदत कार्याला सुरुवात केली. एका रुगणवाहिकेतून तीन महीलाचे शव उमरेड येथे पाठवण्यात आले. उर्वरित जखमींना रुग्णवाहिकेतून नागपूर येथे हलविण्यात आले असून स्वतः सतीश वारजुरकर जखमी सोबत नागपूरला गेले असून सर्व घटनेवर लक्ष ठेऊन आहेत. घटनेची माहिती माहेर येथे होताच सर्व गावात शोककळा पसरली आहे.


PostImage

News mh33 live

Feb. 4, 2024   

PostImage

सुरजागडच्या वाहनाने दुचाकीस्वारास चिरडले तिघांचा जागीच मृत्यू


सुरजागडच्या वाहनाने दुचाकीस्वारास चिरडले तिघांचा जागीच मृत्यू

 

 आकसापुर मार्गावरील घटना

 

 

 

दोन दुचाकी गोंडपिपरी मार्गे चंद्रपूरला जात असताना विरुद्ध दिशेने चंद्रपूर वरून सुरजागडला लोह खनिज आणण्याकरिता जाणाऱ्या हायवाची दुचाकींना जबर धडक दिली यात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि (४) रविवारी दुपारी बारा वाजता दरम्यान घडली आहे.

 

 

अहेरी चंद्रपुर राष्ट्रीय महामार्गावर दिवस रात्र लोह खनिजाच्या कच्चा मालाची वाहतूक सुरू आहे. याआधी अनेक अपघात या मार्गावर घडले आहे. अनेकांना जीव गमवावा लागला. काहींना अपंगत्व आले.  

अहेरी-चंद्रपुर राष्ट्रीय मार्गावरील

 आक्सापूर येथील मंदिरासमोर MH 33 K 6739,MH 34 AG 3224 या दोन दुचाकींना आज रविवारला दुपारच्या सुमारास हायवाने जबर धडक दिली.दरण्यांन दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने अन्य एका दुचाकीला जबर धडक बसली यात एकाच गावातील तिघांचा जागीच मृत्यू झाला.

 अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली.घटनास्थळी कोठारी व गोंडपिपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

 अपघाती हायवा वाहनाचा क्रमांक एम एच 40 सी एम 3233 असून 

शैलेंद्र कालिप्तराय वय 63 वर्ष रा.विजनगर मुलचेरा, जी.गडचिरोली,अमृतोष सुनील सरकार 34 कालीनगर,

मनोज निर्मल सरदार 43 विजयनगर असे मृतकाची नावे आहेत. मृतकाचे शव उत्तरणीय तपासणीसाठी बल्लारशाह येथील रुग्णालयात नेण्यात आले असून 

पुढील तपास कोठारी व गोंडपिंपरी पोलीस करीत आहे.

 घटना घडताच हायवा चालकानी घटनास्थळावरून पोबारा केला असून पोलिसाकडून चालकाचा शोध सुरू आहे.


PostImage

News mh33 live

Feb. 3, 2024   

PostImage

अवैध दारू विक्री च्या विरोधात महिलांनी कसली कंबर!


अवैध दारू विक्री च्या विरोधात महिलांनी कसली कंबर! 

 

सिंदेवाही /लाडबोरी:सिंदेवाही तालुक्यातील मौजा लाडबोरी मधील महिलांनी अवैध दारू विक्री च्या विरोधात कंबर कसली असून अवैध दारू विक्री करणाऱ्यांना इशारा दिला आहे,गावातील संपूर्ण महिला एकजूट पणाने रणरागिणी बनून अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्या साठी सज्ज झाल्या आहेत,या साठी मा.तहसीलदार संदीप पामनंद व मान.पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण यांना निवेदन देत सहकार्य करण्याची विनंती केली आहे,महिलां च्या 

 भूमिकेला ग्रामपंचायत सदस्य,तंटामुक्ती समिती व शाळा व्यवस्थापन समिती यांनी पाठिंबा दिला आहे, गावातील महिलांनी वॉर्ड वार्डात समिती तयार केल्या असून सकाळी 5 वाजता पासून पहारा देत आहे


PostImage

News mh33 live

Jan. 25, 2024   

PostImage

विसापूर येथील अखेर त्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस २४ तासात अटक


विसापूर येथील अखेर त्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस २४ तासात अटक

 

 

बल्लारपूर : २३ जानेवारी ला विसापुर येथील सचीन वंगणे वय ४० वर्ष याला अज्ञात इसमाने धारदार हत्याराने मारून हत्या केली होती. त्याचा भाऊ रमेश वंगणे याचा रिपोर्टवरून पो.ठाणे बल्लारपूर अप क्र ८१ / २०२४ कलम ३०२, ४५२ भांदवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता रविंद्र सिंह परदेशी पोलीस अधिक्षक, रिना जनबंधू अप्पर पोलीस अधिक्षक व दीपक साखरे उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांनी तात्काळ गुन्ह्याचे घटनास्थळाला भेट देवून सदर घटनास्थळी तळ ठोकुन गुन्ह्याचे संबंधाने उपयुक्त मार्गदर्शन करून पो.ठाणे बल्लारपूर व स्थानीक गुन्हे शाखा, चंद्रपुर असे दोन पथक तयार केले.

     पो.ठाणे बल्लारपूर व स्थानीक गुन्हे शाखेचा पथकाने आरोपीबाबत कोणताही सुगावा नसताना अतिशय कौशल्यपुर्ण तपास करून आरोपीबाबत गोपनीय माहिती काढुन २४ तासाचे आत आरोपी यास निष्पन्न करून आरोपी नामे विठ्ठल उर्फ डेनी गोसाईराव डबरे वय ३७ वर्ष रा.वार्ड क्र १ विसापुर ता.बल्लारपूर यास ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे.

सदर कामगिरी पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपुर, उप विभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश पाटील, पोलीस निरीक्षक महेश कोंडावार (स्थागुशा), सपोनी रमेश तळी, सपोनी विकास गायकवाड (स्थागुशा), सपोनी प्राची राजुरकर, पोउपनि वर्षा नैताम, पो.हवा रनविजय ठाकुर, यशवंत कुमरे, बाबा नैताम, संतोष दंडेवार, अनुप डांगे, मिलींद चव्हान, जमीर पठान, नितेश महात्मे (स्थागुशा), पो.अं श्रीनीवास वाभीटकर, प्रसंनजित डोर्लीकर, प्रकाश मडावी, प्रसाद घुलगंडे यांनी केली आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 13, 2024   

PostImage

Chandrapur news: चंद्रपुरात ब्राऊन शुगर विक्री, दोघांना अटक


चंद्रपूर : पोलीस येथील शहरपोलिस ठाण्याच्या हद्दीत ब्राऊन शुगर विक्री करीत असलेल्या दोन युवकांना शहर पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. आरोपींवर ३०/२४ क. ८ (सि), २१ (बी) एन.डि.पी.एस. अॅक्ट अन्वये शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

यातील आरोपी सोहेल शेख हे चोरून लपुन ब्राउन शुगरची विक्री करीत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांचे पथकाने जुनी लालपेठ वस्तीमध्ये धाड टाकली. यावेळी सोहेल सलीम शेख (२३) रा. जुनी लालपेठ वस्ती चंद्रपुर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचजवळ ११० रू., ओपो कंपनीचा मोबाईल १५,००० रू. चा, ७.१२ ग्रॅन वजनाचा ब्राउन शुगर किं. १७,८०० रू., विवो कंपनीचा मोबाईल किं. २५,००० रू. चा असा एकुण ५७,९१० रू. चा ऐवज मिळुन आला.

 

आरोपीकडून अधिक चौकशी केली असता, सदर मिळालेला ब्राउन शुगर हे आवेश कुरेशी रा. भंगाराम वार्ड चंद्रपुर याचे करीता विक्री करतो, असे आरोपीने सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी सोहेल सलीम शेख (२३) रा. जुनी लालपेठ वस्ती चंद्रपुर, व आवेश शब्बीर कुरेशी (३८) रा. भंगाराम वार्ड चंद्रपुर) या दोघांना अटक केली आहे. सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागिय पोलीस अधिकारी, सुधीर नंदनवार यांचे मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपुत, सपोनि. मंगेश भोंगाडे, रमीझ मुलानी, पोउपनि शरिफ शेख, विलास निकोडे, महेंद्र बेसरकर, जयंता चुनारकर, संतोष पंडीत, सचिन बोरकर, निलेश मुडे, भावना रामटेके, नापोशि. चेतन गज्जलवार, पो. अं. इम्रान खान, संतोष कावळे, दिलीप कुसराम, ईरशाद शेख, रूपेश रणदिवे, रूपेश पराते यांनी केलेली आहे.